RBI Repo Rate June 2025 – जून 2025 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पुन्हा एकदा चर्चेत आहे. 4 जूनपासून सुरू झालेली ही बैठक 6 जूनला संपली, आणि RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर केले. सर्वसामान्य कर्जदार, गृहकर्ज घेणारे आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष यावरच लागून होते.
सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात! RBI Repo Rate June 2025
होय, RBI ने पुन्हा एकदा रेपो दरात 0.25% कपात करत तो 5.50% वर आणला आहे. याआधी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये देखील RBI ने प्रत्येकी 0.25% कपात केली होती. म्हणजेच, फेब्रुवारी 2025 पासून रेपो दरात एकूण 0.75% कपात झाली आहे!
स्वस्त कर्जाची पर्वणी सुरूच!
(RBI Repo Rate June 2025) या निर्णयामुळे बँकांना RBI कडून स्वस्त दरात पैसे मिळतात आणि बँका ही बचत कर्जदारांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर कमी होतात. आता EMI देखील कमी होणार हे निश्चित!
महागाई नियंत्रणात, म्हणून RBI आक्रमक!
(EMI Cut June 2025) महागाई दर सध्या 4% च्या खाली आहे. म्हणजेच RBI ला व्याजदर कपात करण्यासाठी मोकळं मैदान मिळालं. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देखील RBI ने “न्यूट्रल” स्टान्स वरून “अॅकमोडेटिव्ह” स्टान्स घेतल्यामुळे भविष्यात देखील अशीच वाढीला चालना देणारी धोरणं अपेक्षित आहेत.
कर्जदारांसाठी मोठी बातमी!
जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा आधीच लोन घेतलं असेल, तर EMI कमी होण्याची शक्यता आहे. बँका लवकरच त्यांचे RLLR (Repo Linked Lending Rate) आणि MCLR अद्यतनित करू शकतात. त्यामुळे आता कर्ज घेणं आणखी सोपं होणार!
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे फायदे कोणाला? RBI Repo Rate June 2025
- गृहकर्जधारक – EMI कमी होईल
- व्यवसायिक – स्वस्त कर्जामुळे व्यवसाय विस्तारता येईल
- उद्योग – कॉर्पोरेट गुंतवणूक वाढेल
- ग्राहक – बाजारात खरेदीसाठी पैसा हातात राहील
हे पण वाचा :- Chenab Railway Bridge, Google चे 4 नवीन AI टूल्स 2025, महाराष्ट्रात कधी आणि किती पाऊस पडणार?