Site icon Pulse Marathi

“शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर बंदी! नवा निर्णय आता थेट नोकरीवर परिणाम करणार?”

New Social Media Rules for Government Employees: शासकीय कर्मचाऱ्यांनो सावधान! सोशल मीडिया वापरासाठी नवीन कठोर नियम; जाणून घ्या काय आहे निर्णय?

शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर बंदी! : महाराष्ट्र शासनाने आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलं आहे. या नव्या नियमांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणं सहज शक्य राहिलेलं नाही. अनेक कर्मचारी आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटरवर गणवेशातले फोटो, सरकारी इमारतींच्या पार्श्वभूमीतील व्हिडीओ, कार्यालयाचे लोगो किंवा पदनाम वापरत होते. पण आता हे सगळं थांबवण्यासाठी आदेश सरकारने दिले आहेत. (New Social Media Rules For Government Employees)

या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे की, सरकारी कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावर शासकीय मालमत्ता, योजना, किंवा पदनाम यांच्याशी संबंधित काहीही पोस्ट करू शकत नाहीत. तसेच, सरकारविरोधात नकारात्मक किंवा चुकीची माहिती प्रसारित केल्यास, शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

गोपनीय माहिती लीक होऊ नये, तसेच शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी हे नियम आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, हे नियम फक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठीच नाहीत, तर कंत्राटी, प्रतिनियुक्तीवर असलेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी यांनाही लागू असतील.

काय आहे बंदी? (सरकारी कर्मचारी सोशल मीडिया नियम)

काय करण्याची मुभा आहे?

सोशल मीडिया नियमांचे उल्लंघन केल्यास काय होणार?

या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यामध्ये निलंबन, वेतनात कपात, पदोन्नती रोखणे अशा प्रकारच्या कठोर उपाययोजनांचा समावेश असू शकतो. हे नियम नियमित कर्मचाऱ्यांसोबतच, कंत्राटी कर्मचारी, आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लागू आहेत.

शासनाचा उद्देश काय?

डिजिटल युगात सोशल मीडिया माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. मात्र, याचा गैरवापर टाळण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता जपण्यासाठी हे नियम आवश्यक असल्याचं शासनाने स्पष्ट केलं आहे. शासकीय कर्मचारी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, त्यामुळे त्यांच्या वागणुकीचा समाजावर परिणाम होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घ्यावी, फक्त खात्रीशीर व अधिकृत माहितीच शेअर करावी आणि शासनाच्या धोरणांप्रती निष्ठा ठेवावी, असं आवाहन शासनाने केलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन नियमावली नक्कीच महत्त्वाची आहे. या नियमांमुळे सोशल मीडिया वापरामध्ये अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे. (शासनाचे सोशल मीडिया परिपत्रक)

जर तुम्हाला ही  माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच पडेट्ससाठी PulseMarathi.com वर नियमित भेट द्या.

हे पण वाचा :- पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी रेल्वे भरती 2025

Exit mobile version