Site icon Pulse Marathi

Indian Railway Paramedical Recruitment 2025: 400+ जागा, त्वरित अर्ज करा!

रेल्वे भरती 2025: पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी रेल्वे भरती 2025: 400+ जागा, जाणून घ्या सर्व तपशील!

रेल्वे मंत्रालय पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करत आहे. रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या Indian Railway Paramedical Recruitment 2025 Adv. No. CEN 03/2025 अंतर्गत ही भरती होणार असून, एकूण 434 पदांसाठी ही भरती निघाली आहे आहे. इच्छुक उमेदवार 9 ऑगस्ट 2025 पासून अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

भरती अंतर्गत कोणकोणती पदे?

या भरतीत नर्सिंग अधीक्षक, डाईलायसिस टेक्निशियन, स्वास्थ्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड II, फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड), रेडियोग्राफर एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लेबोरेटरी सहाय्यक ग्रेडII, इत्यादी पदांचा समावेश आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि वेतनमान वेगवेगळे आहे. वेतन लेव्हल 4 ते 7 पर्यंत असून सुरुवातीचे वेतन ₹21,700 ते ₹44,900 (+ इतर सर्व भत्ते) दरम्यान आहे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी बी.एससी. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा आवश्यक आहे. फार्मासिस्टसाठी फार्मसीमध्ये डिप्लोमा लागतो. उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षांदरम्यान असावे, परंतु आरक्षित प्रवर्गांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट दिली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

भरती प्रक्रिया कशी असेल?

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आणि आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीनंतर अंतिम निवड केली जाईल. या भरतीची संपूर्ण माहिती संबंधित रेल्वे भरती बोर्डांच्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

अर्ज कुठे करायचा?

उमेदवार संबंधित RRB च्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. RRB अहमदाबाद, मुंबई, पटणा, अजमेर, भोपाळ, गुवाहाटी, जम्मू श्रीनगर, कोलकाता, भुवनेश्वर, बिलासपूर, मालदा, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुडी, बेंगळुरु, गोरखपूर, चंदीगढ़, चेत्रई अशा विविध क्षेत्रीय बोर्डांमार्फत ही भरती होणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज Link Active on 09/08/2025
🗒️ जाहिरात PDF Download करा

ही एक चांगली संधी आहे खास करून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी. सरकारी नोकरी, स्थिरता आणि केंद्र सरकारच्या सुविधा लाभण्याची संधी निश्चितच आकर्षक आहे. जर तुम्हाला या भरतीबाबत अर्ज करण्याची योजना असेल, तर अधिकृत वेबसाइटला वेळेवर भेट द्या आणि सर्व अटी वाचूनच अर्ज भरा. अशा आणखी सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी PulseMarathi.com ला भेट द्या.

हे पण वाचा :- एफडीपेक्षाही सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे सरकारी गुंतवणूक पर्याय!

Exit mobile version