iPhone 17, 17 Pro, 17 Pro Max : भारतात लाँच कधी? किंमत, फीचर्स, डिझाइन पूर्ण माहिती

iPhone 17, 17 Pro, आणि 17 Pro Max: भारतातील किंमत, कॅमेरा, चिपसेट, डिझाइन याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!

Apple कंपनीने 2025 साली आपल्या आगामी iPhone 17 Series ची तयारी पूर्ण केली असून, या वर्षी तब्बल 3 मॉडेल्स लाँच होणार आहेत — iPhone17, iPhone17 Pro, आणि iPhone 17 Pro Max.

iphone 17

Expected Launch Date 

सामान्यतः Apple दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या नवीन iPhone सीरिज लाँच करतं. त्यामुळे iPhone17 Series ची घोषणा 9 सप्टेंबर 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. यानंतर प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होऊन, 19 सप्टेंबरपासून स्टोअरमध्ये विक्रीला उपलब्ध होईल, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

Expected Price in India 

तज्ञांच्या अंदाजानुसार, iPhone 17 ची भारतात सुरुवातीची किंमत ₹89,900 असू शकते. किंमतींमध्ये देशागणिक कर रचना, चलनवाढ, स्थानिक बाजारातील स्पर्धा अशा विविध घटकांमुळे बदल होऊ शकतो.

Camera Upgrades: सेल्फी प्रेमींना मोठा दिलासा

iPhone 17 सीरिजमधील सर्व मॉडेल्समध्ये 24MP फ्रंट कॅमेरा दिला जाणार असल्याचं Jeff Pu व Ming-Chi Kuo या सुप्रसिद्ध तज्ञांनी सांगितलं आहे. हा कॅमेरा iPhone 16 Series मधील 12MP कॅमेराच्या तुलनेत दुप्पट क्षमतेचा आहे. त्याचबरोबर, iPhone 17 Pro मध्ये 48MP टेलीफोटो लेन्ससह 3.5x ऑप्टिकल झूम क्षमता असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे — हे कॅमेरा मॉड्यूल आडवे पद्धतीने असणार असल्याने डिझाइनमध्येही बदल दिसून येणार आहे.

Chipset: A19 ची ताकद

Apple दरवर्षी आपल्या iPhones साठी नवीन चिपसेट वापरतो. यावर्षी iPhone17 Pro आणि Pro Max मध्ये A19 Pro चिप वापरण्यात येईल, जी अधिक वेगवान आणि ऊर्जा कार्यक्षम असेल. तर, iPhone17 मध्ये A19 किंवा A18 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. TSMC च्या 2nm प्रोसेसरच्या वापराची शक्यता कमी आहे, पण ही चिप 3nm enhanced architecture वर आधारित असेल.

Design Update: पुन्हा अ‍ॅल्युमिनियम Frame iphone 17

iPhone 17 Series मध्ये सर्व मॉडेल्समध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम्स दिल्या जाणार आहेत. यापूर्वी Apple ने Pro मॉडेल्समध्ये स्टेनलेस स्टील, आणि नंतर टायटॅनियम वापरलं होतं.
पण यंदा कंपनी पुन्हा एकदा अ‍ॅल्युमिनियम वापरणार आहे, जे हलकं, मजबूत आणि पर्यावरणपूरक मानलं जातं. हे बदल iPhone ला एक नविन लूक देऊ शकतात.

जर तुम्हाला ही  माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी PulseMarathi.com वर नियमित भेट द्या.

हे पण वाचा :- Samsung Galaxy Tab S10 FE: प्रीमियम अनुभव असलेला मिड-रेंज टॅबलेट

1 thought on “iPhone 17, 17 Pro, 17 Pro Max : भारतात लाँच कधी? किंमत, फीचर्स, डिझाइन पूर्ण माहिती”

Leave a Comment

Index