Indian Air Force Agniveer / Agniveervayu Recruitment 2025 :
Indian Air Force (IAF) अंतर्गत Agnipath योजनेअंतर्गत Agniveer/Agniveervayu साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील अविवाहित तरुण-तरुणींना 4 वर्षांच्या सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना सैनिकी जीवनाचा अनुभव मिळतो, तसेच सेवा निधी, प्रशिक्षण, भत्ते व भविष्याच्या संधीही उपलब्ध होतात.
Registration & Exam Schedule:
- ऑनलाईन नोंदणी सुरुवात: 11 जुलै 2025 पासून
- अंतिम तारीख: 31 जुलै 2025 रात्री 11:00 वाजेपर्यंत
- ऑनलाईन परीक्षा: 25 सप्टेंबर 2025 पासून सुरू
- नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ: https://agnipathvayu.cdac.in
Eligibility Criteria:
- वय मर्यादा:
- जन्मतारीख 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 दरम्यान असावी.
- नोंदणीच्या वेळी वय 21 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वैवाहिक स्थिती:
- उमेदवार अविवाहित असावा व सेवा कालावधीत विवाह न करण्याचा शब्द द्यावा लागेल.
- शैक्षणिक पात्रता:
- सायन्स विषयासाठी:
- 12वी (Maths, Physics, English) – 50% गुणांसह
- किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (3 वर्ष)
- किंवा 2 वर्षांचा व्होकेशनल कोर्स (Maths व Physics सहित)
- सायन्स शिवाय इतर विषयासाठी:
- कोणत्याही विषयात 12वी – 50% गुणांसह and 50% in English
- किंवा 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स with English subject
- सायन्स विषयासाठी:
Physical & Medical Standards:
- उंची: पुरुष – किमान 152 सेमी | महिला – 152 सेमी (विशिष्ट भागासाठी सवलत)
- छाती: पुरुष – 77 सेमी (5 सेमी फुगवण आवश्यक)
- Vision: चष्म्याशिवाय 6/12, सुधारल्यावर 6/6
- इतर आरोग्य निकष: आरोग्यपूर्ण दात, कान, त्वचा, आणि मानसिक/शारीरिक फिटनेस आवश्यक
Salary and Allowances:
- पहिल्या वर्षी पगार: ₹30,000 (हातात ₹21,000)
- 4 वर्षांमध्ये वाढ: अखेरच्या वर्षी ₹40,000
- सेवा निधी (Seva Nidhi): ₹10.04 लाख (सरकारी व वैयक्तिक योगदानासह)
- विमा संरक्षण: ₹48 लाखांचा जीवनविमा
- इतर फायदे: राहण्याची व्यवस्था, ड्रेस भत्ता, रेशन, LTC इत्यादी
सेवा कालावधी आणि संधी:
Agniveervayu म्हणून उमेदवार 4 वर्षांसाठी भारतीय हवाई दलात भरती होईल. त्यानंतर 25% उमेदवारांना परफॉर्मन्सच्या आधारे नियमित सेवेत सामील होण्याची संधी मिळेल. बाकीचे उमेदवार त्यांच्या अनुभवासह इतर क्षेत्रात नोकरीसाठी पात्र होतील. (AGNIVEERVAYU INTAKE 02/2026)
Selection Process:
- ऑनलाईन परीक्षा (Phase I) – Science/Non-Science विषयानुसार
- Physical Fitness Test (PFT) – Running, Push-ups/Sit-ups/Squats
- Adaptability Tests I & II
-
Medical Examination
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- 10वी प्रमाणपत्र
- 12वी मार्कशीट/डिप्लोमा/व्होकेशनल कोर्स कागदपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
-
फोटोज, अंगठ्याचा ठसा, सही इत्यादी
हे पण वाचा :- 8th Pay Commission 2026 : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ