Site icon Pulse Marathi

Sanjay Gandhi Niradhar Yojana Mandhan Vadh: संजय गांधी निराधार योजना 2025 ऑक्टोबरपासून ₹2500 महिना

दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी: निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील मानधनात मोठी वाढ; ऑक्टोबरपासून ₹2500 महिना

Sanjay Gandhi Niradhar Yojana Mandhan Vadh: राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravanbal Seva Rajya Nivrutti Vetan Yojana) यांतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार (GR) दिव्यांगांना आता दरमहा ₹1500 ऐवजी थेट ₹2500 मानधन मिळणार आहे. हा निर्णय १५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला असून ऑक्टोबर २०२५ पासून या वाढीचा लाभ लागू होणार आहे. या बदलामुळे जवळपास ५ लाखांच्या घरातील दिव्यांग लाभार्थ्यांना थेट फायदा मिळणार आहे.

महाराष्ट्र शासन निर्णय दिव्यांग काय आहे शासनाचा निर्णय?

महाराष्ट्र शासन निर्णय दिव्यांग PDF मध्ये प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार :

लाभार्थ्यांची संख्या किती?

उपलब्ध आकडेवारीनुसार :

हे पण वाचा :- महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC Bima Sakhi Yojana 2025 मध्ये दरमहा मिळणार ₹7000, अर्ज लगेच करा

वाढीमागची पार्श्वभूमी

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या निर्णयासाठी शासनाने जवळपास ५७० कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यानुसार निधी वितरणाची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होईल.

बच्चू कडूंचा पाठपुरावा फळाला

या निर्णयामागे आमदार बच्चू कडू यांचा सातत्यपूर्ण लढा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला आहे. त्यांनी दिव्यांग बांधवांच्या मानधन वाढीसाठी वेळोवेळी आवाज उठवला होता आणि उपोषणासारखे आंदोलनही केले होते. त्यांच्या या मागणीला अखेर शासनाने मान्यता देत दिव्यांगांना दिलासा दिला आहे.

दिव्यांग बांधवांसाठी दिलासा

या वाढीमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढलेल्या मानधनामुळे दिव्यांगांना :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सांगितले की, “शासनाचा हा निर्णय दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

विषय LINK
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
शासन निर्णय येथे क्लिक करा

 

निराधार योजना मानधन वाढ या निर्णयामुळे राज्यातील सामाजिक सुरक्षा योजनांवरचा विश्वास वाढणार आहे. दिव्यांग, निराधार, विधवा आणि वृद्धांसाठी सुरू असलेल्या योजनांमध्ये येत्या काळात आणखी सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे. वाढीव ₹२५०० मानधनामुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरतो.

जर तुम्हाला ही  माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी PulseMarathi.com वर नियमित भेट द्या.

हे पण वाचा :- सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ! आजचा दर 1,12,625 रुपये!

 

Exit mobile version