Samsung त्यांचा नवीन Tablet Samsung Galaxy Tab S10 FE लाँच केला आहे. (नवीन सॅमसंग टॅबलेट 2025) Fan Edition Series मध्ये हा टॅबलेट कमी किमतीत प्रीमियम अनुभव देतो. विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठी योग्य ठरणारा हा टॅबलेट डिझाईन, परफॉर्मन्स आणि फीचर्समध्ये तगडा पर्याय ठरतो.
Design and Build Quality
Samsung Galaxy Tab S10 FE मध्ये प्रीमियम अॅल्युमिनियम युनिबॉडी डिझाईन दिले आहे. टॅबलेट केवळ 6 मिमी जाडीचा असून त्याला IP68 वॉटर व डस्ट प्रूफ सर्टिफिकेशन आहे. हा टॅबलेट ग्रे, सिल्व्हर आणि ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Display
Samsung Galaxy Tab S10 FE मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 10.9-इंचाचा LCD display असून FE+ मध्ये 13.1 इंचाचा मोठा स्क्रीन दिला आहे. दोन्ही स्क्रीनमध्ये QHD+ Resolution आणि 800 nits ब्राइटनेस आहे, ज्यामुळे बाहेर वापरताना चांगली Visibility मिळते.
Performance and Speed
हा टॅबलेट Exynos 1580 (4nm) processor सह येतो. यामध्ये Samsung DeX mode देखील आहे, जो लॅपटॉपसारखा इंटरफेस वापरू देतो. दैनंदिन वापर, स्ट्रीमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी हा टॅबलेट उत्कृष्ट आहे.
Camera
Samsung Galaxy Tab S10 FE मध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा दिला आहे. व्हिडिओ कॉल्ससाठी व ऑनलाइन मीटिंगसाठी हा कॅमेरा योग्य आहे. यात AI based tools जसे की Object Eraser आणि Best Face उपलब्ध आहेत.
Audio and Connectivity
- AKG ट्यून केलेले ड्युअल स्पीकर्स
- Wi-Fi 6 / Wi-Fi 6E (FE+)
- Bluetooth 5.3
- 5G support (केवळ Tab S10 FE)
यात SmartThings, Quick Share आणि Samsung Notes सारख्या AI-आधारित फीचर्स देखील आहेत.
S Pen Support
Samsung Galaxy Tab S10 FE मध्ये S Pen फ्रीमध्ये दिली जाते. ती मॅग्नेटिकली टॅबलेटच्या मागे अटॅच होते. यामध्ये BLE फीचर्स (Air Actions) नाहीत, पण लेखन, स्केचिंगसाठी ती परिपूर्ण आहे. Tab S10 FE+ मध्ये AI शॉर्टकट कीसह कीबोर्ड कव्हर सपोर्ट देखील आहे.
Battery and Charging
- Tab S10 FE: 8,000mAh बॅटरी Tab S10 FE+: 10,090mAh बॅटरी
- 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट (चार्जर वेगळा विकत घ्यावा लागतो)
- व्हिडिओ प्लेबॅक: 20 ते 21 तासांपर्यंत
Price and Variant
Samsung Galaxy Tab S10 FE भारतात खालील किंमतींमध्ये लाँच झाला आहे:
- Tab S10 FE (10.9 इंच) – Wi-Fi: ₹41,999
- Tab S10 FE (10.9 इंच) – 5G: ₹49,999
- Tab S10 FE+ (13.1 इंच – Wi-Fi): ₹53,999
या टॅबलेटमध्ये 8GB किंवा 12GB RAM, व 128GB/256GB स्टोरेज पर्याय आहेत. microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
Samsung Galaxy Tab S10 FE हा टॅबलेट प्रीमियम फीचर्ससोबत वाजवी किमतीत मिळतो. विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारा हा टॅबलेट, उत्तम डिझाईन, S Pen, चांगला बॅटरी बॅकअप आणि AI-आधारित फीचर्ससह टॅबलेट मार्केटमध्ये एक चांगला पर्याय आहे.
Product Link : https://amzn.to/4kGvatt
हे पण वाचा :- Chenab Railway Bridge, Google चे 4 नवीन AI टूल्स 2025, ChatGPT Down अचानक – भारतात वापरकर्त्यांचा संताप
2 thoughts on “Samsung Galaxy Tab S10 FE: प्रीमियम अनुभव असलेला मिड-रेंज टॅबलेट”