इंग्लंडमध्ये इतिहास घडला – ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अभूतपूर्व विक्रम: एका कसोटीत दोन शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक!

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत मजबूत आघाडी घेतली आहे, आणि या सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरला आहे – Rishabh Pant! यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शानदार शतकं ठोकत इतिहास रचला आहे. तो इंग्लंडमध्ये एका कसोटीत दोन शतके करणारा Rishbh Pant पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो एका कसोटीत दोन शतके करणारा पहिला यष्टीरक्षक बनला आहे – आणि तेही विदेशी भूमीवर!

Rishabh Pant

पहिल्या डावात Rishabh Pant ची धडाकेबाज खेळी

    • पहिल्या डावात भारताने 471 धावा केल्या. शुबमन गिल (147) आणि यशस्वी जैस्वाल (101) यांनी सुरुवात छान दिली. पण खऱ्या अर्थाने खेळाचा प्रवाह बदलला तो ऋषभ पंतच्या आक्रमक शतकाने. त्याने फक्त 178 चेंडूंमध्ये 134 धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांची झोप उडवली.

दुसऱ्या डावातही फॉर्म कायम

    • पहिल्या डावातील झणझणीत 134 धावांच्या खेळीनंतर Rishabh Pant ने दुसऱ्या डावातही धमाकेदार आणि जिद्दी शतक झळकावले. हे शतक विशेष महत्त्वाचे ठरले कारण भारताने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीसच कर्णधार शुभमन गिलची विकेट गमावली होती आणि संघ दबावाखाली होता. अशा कठीण वेळी पंतने पुन्हा एकदा आपली दर्जेदार खेळी सादर करत संयम आणि आक्रमकतेचा उत्तम समतोल साधला. के.एल. राहुलच्या शतकी खेळीच्या साथीने त्यांनी भारताला सामन्यावर नियंत्रण मिळवून दिलं.
    • दुसऱ्या डावातसुद्धा पंतने आपली फॉर्म आणि धाडस दाखवले. 153 चेंडूंमध्ये 118 धावा करत त्याने पुन्हा एकदा शतक साजरे केले. हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
    • इंग्लंडमध्ये एका कसोटीत दोन शतके करणारा Rishabh Pant पहिला भारतीय फलंदाज
    • कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात दोन शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक

Rishabh Pant ने केवळ शतकं ठोकून नाही तर इतिहास घडवून पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात आक्रमक आणि विश्वासार्ह खेळाडू आहे. त्याचा हा पराक्रम केवळ एक खेळी नाही, तर भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे.

हे पण वाचा :-  भारताचा पहिल्या दिवसात वर्चस्व,  ICC WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय

Leave a Comment