DMER Recruitment 2025 (DMER महाराष्ट्र भरती 2025): 1107 पदांसाठी सुवर्णसंधी!

DMER Recruitment 2025 महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागात थेट सेवा पद्धतीने 1107 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना www.med-edu.in या संकेतस्थळावर 18 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत ही भरती पार पडणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. DMER महाराष्ट्र भरती 2025 ही आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि अनुभवी उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून ही संधी साधावी.

DMER Recruitment 2025

रिक्त पदांचा तपशील: DMER Recruitment 2025

  • या भरतीमध्ये ग्रंथपाल, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट अशा विविध गट-क तांत्रिक आणि अति तांत्रिक संवर्गातील पदांचा समावेश आहे.
  • एकूण पदे:
    • तांत्रिक संवर्ग (Technical Cadre): 1058 पदे
    • अति तांत्रिक संवर्ग (Non-technical cadre): 49 पदे
    • एकूण: 1107 पदे

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 19 जून 2025, संध्याकाळी 5.00 वाजता
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 जुलै 2025, रात्री 11.55 वाजेपर्यंत
  • फी भरण्याची अंतिम मुदत: 9 जुलै 2025

पात्रता आणि शैक्षणिक अर्हता:

    • पदानुसार वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता आहे. उदा. प्रयोगशाळा सहाय्यकासाठी B.Sc किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. फार्मासिस्टसाठी D.Pharm/B.Pharm आणि वैध नोंदणी आवश्यक आहे. सर्व पदांसाठी सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीत दिली आहे.

वयोमर्यादा:

  • खुल्या प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी: 18 ते 43 वर्षे
  • (इतर सवलती – अनाथ, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त यांना वेगळ्या अटी लागू)

परीक्षा पद्धती:

  • CBT (Computer Based Test): बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा.
  • प्रश्न मराठी आणि इंग्रजी भाषेत.
  • ही पदांसाठी कौशल्य चाचणीही घेतली जाईल.
  • परीक्षेचे एकूण गुण: 200 (Technical), 120+80 (Stenographer/Driver)

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000
  • मागासवर्गीय प्रवर्ग: ₹900 

ऑनलाइन अर्ज कसा कराल? DMER Recruitment 2025

    • उमेदवारांनी www.med-edu.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. DMER Recruitment 2025

हे पण वाचा :- RBI चा रेपो दर कपात निर्णय – EMI होणार अजून कमी? / RBI Repo Rate June 2025Tatkal Tickets चे नवीन नियम 2025

Leave a Comment