(RBI Repo Rate) RBI ने Repo Rate कमी केले,आहे जाणून घ्या EMI कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

RBI Repo Rate भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून देशातील आर्थिक परिस्थितीनुसार दर तीन महिन्यांनी रेपो रेटमध्ये बदल केला जातो. काही दिवसांपूर्वी RBI ने रेपो रेटमध्ये कपात केली असून, ही बातमी अनेक गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज धारकांसाठी दिलासादायक आहे. मात्र, RBI ने रेपो रेट कमी केल्यावर आपोआप EMI कमी होते का? हे खरंच शक्य आहे का? या लेखात आपण EMI कमी होण्यासाठी लागणारी अचूक प्रक्रिया, फिक्स आणि फ्लोटिंग व्याजदरातील फरक, तसेच बँकेकडून कोणत्या अटी तपासाव्यात, याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

rbi repo rate

RBI Repo Rate म्हणजे काय?

रेपो रेट (Repo Rate) म्हणजे RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जावर लागणारा व्याजदर. जेव्हा RBI Repo Rate कमी करते, तेव्हा बँकांना कमी दराने पैसे मिळतात. परिणामी, बँका आपल्याही ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात.

उदाहरणार्थ, जर RBI Repo Rate 6.5% वरून 6.25% झाला, तर बँकेचे कर्ज देण्याचे खर्च कमी होतात आणि काही वेळाने कर्जदारांना सुद्धा याचा फायदा होतो.

EMI कमी होण्याची शक्यता – कोणाला आणि कधी?

RBI Repo Rate कमी झाल्यावर सर्वच ग्राहकांचे EMI कमी होत नाही. यामागे कारण आहे तुमच्या कर्जाचा व्याजदर कोणत्या प्रकाराशी लिंक आहे हे.

फिक्स्ड (Fixed) vs फ्लोटिंग (Floating) व्याजदर – संपूर्ण समजावून घ्या

फ्लोटिंग व्याजदर (Floating Rate Loan)

  • हे व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार सतत बदलतात.
  • यामध्ये कर्ज RBI च्या Repo Rate शी थेट लिंक केलेले असते (उदा. EBLR – External Benchmark Lending Rate).
  • RBI Repo Rate मध्ये कपात केल्यावर फ्लोटिंग रेटवर असलेल्या कर्जाचे EMI कमी होतात.
  • उदाहरण: जर कर्ज 8.5% दराने होते आणि रेपो रेटमध्ये घट झाल्याने ते 8.1% झाले, तर EMI तात्काळ कमी होते.

फिक्स्ड व्याजदर (Fixed Rate Loan)

  • या प्रकारात, तुम्ही जेव्हा कर्ज घेतात तेव्हा ठराविक दरावर ते लॉक केले जाते.
  • पुढे RBI कितीही Repo Rate कमी करेल, तरी EMI बदलत नाही.
  • फिक्स रेटचे फायदे म्हणजे स्थिरता, पण तोटे म्हणजे बाजारातील दर कमी झाले तरी फायदा मिळत नाही.
  • काही बँका 2-3 वर्षांनंतर फिक्स रेटला फ्लोटिंगमध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय देतात.

EMI कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्ही फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतले असेल, तर EMI आपोआप बदलतो. पण जर तुमचे कर्ज MCLR किंवा Fixed रेटशी लिंक असेल, तर खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागते:

1. तुमचे कर्ज कोणत्या दर प्रणालीशी लिंक आहे हे तपासा

  • Loan Statement, Net Banking किंवा Mobile App वर लॉगिन करून “Interest Rate Type” तपासा.
  • जर ‘Repo Linked’, ‘EBLR’, किंवा ‘Floating’ असा उल्लेख असेल, तर तुम्हाला दरकपातचा फायदा होऊ शकतो.

2. बँकेकडे कर्ज “Rate Conversion” साठी अर्ज करा

  • जर तुमचे कर्ज MCLR किंवा Fixed रेटवर असेल, तर तुम्ही बँकेला Repo-Linked Rate मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.
  • यासाठी प्रोसेसिंग फी (₹1000 ते ₹5000) लागू शकते.
  • अर्ज ऑनलाईन किंवा ब्रँचमध्ये जाऊन भरता येतो.

3. कर्ज Re-Structure केल्यानंतर काय होते?

  • बँक तुमचा नवीन व्याजदर ठरवते (उदा. 9% वरून 8.5%).
  • नवीन EMI मोजला जातो – त्यामुळे तुमची मासिक हप्ता रक्कम कमी होते.
  • काही वेळा EMI तशीच राहते पण कर्जाचा कालावधी (tenure) कमी केला जातो.

महत्वाच्या सूचना:

  • क्रेडिट स्कोअर नीट ठेवा: जर तुमचा CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल, तर बँक लवकर मंजुरी देते.
  • Terms and Conditions वाचा: काही बँका EMI कमी करत असताना processing fee व additional documents मागू शकतात.
  • इतर बँकांशी तुलना करा: जर तुमच्या बँकेचा दर जास्त असेल, तर दुसऱ्या बँकेकडून refinance घेणेही फायदेशीर ठरू शकते.

EMI कमी करण्याचे पर्यायी मार्ग

  • Part Payment करा: एकावेळी काही हजार रुपये जास्त भरल्यास, कर्जाची व्याज रक्कम कमी होऊ शकते.
  • Top-up loan टाळा: पुन्हा कर्ज घेणे टाळल्यास EMI मध्ये वाढ होणार नाही.
  • ऑटो डेबिट सेवा वापरा: वेळेवर EMI भरल्यास बँक काही वेळी सूट देते.

हे पण वाचा :- RBI चा रेपो दर कपात निर्णय – EMI होणार अजून कमी? / RBI Repo Rate June 2025

Leave a Comment