ICC WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात

ICC World Test Championship 2025 Final (ICC WTC Final 2025) मध्ये दक्षिण आफ्रिकेने शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी विजय मिळवून आपले पहिलेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २८२ धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि क्रिकेट चाहत्यांना एक संस्मरणीय क्षण दिला.

ICC WTC FINAL 2025
CREDITS – starsportsindia/insta

Match Highlights/ ICC WTC Final 2025

🏏1st Innings  – Australia : 212 धावा

लॉर्ड्स, लंडन येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. स्टीव्ह स्मिथ (66) आणि ब्युअ वेबस्टर (72) यांनी झुंज दिली, मात्र कगिसो रबाडाने 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा कणा मोडला.

🏏South Africa 1st Innings : 138 धावा

दक्षिण आफ्रिकेची पहिली फलंदाजी देखील फारशी यशस्वी ठरली नाही. पॅट कमिन्सने 6 विकेट्स घेत त्यांना फक्त १३८ धावांवर रोखले. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चांगला संधी मिळाली.

🏏2nd Innings -Australia : 207 धावा

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली. अ‍ॅलेक्स कॅरी (43) आणि मिचेल स्टार्क (58)* हेच ठळक फलंदाज ठरले. ऑस्ट्रेलिया २०७ धावांवर बाद झाला. पुन्हा एकदा रबाडा (4 विकेट्स) आणि लुंगी एनगिडी (3 विकेट्स) यांनी चमकदार कामगिरी केली.

🏏South Africa 2nd Innings : 282/5 – विजय!

२८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच दिवशी ४३/४ अशी बिकट स्थिती ओलांडली. मात्र दुसऱ्या दिवशी एडन मार्कराम (136) आणि कर्णधार टेंबा बवुमा (66) यांनी जबरदस्त भागीदारी करत सामना आपल्या बाजूला झुकवला. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ५ विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण करत पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले.

सामन्यातील महत्त्वाचे क्षण

  • कगिसो रबाडा – एकूण 9 विकेट्स
  • पॅट कमिन्स – पहिल्या डावात 6 विकेट्स
  • एडन मार्कराम – सामन्यावीर (136 धावांची शानदार खेळी)
  • लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला ICC फायनल ट्रॉफी विजय

३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वप्नपूर्ती!

दक्षिण आफ्रिका १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनः सामील झाल्यानंतर अनेकदा ICC स्पर्धांमध्ये उतरली. मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या वाट्याला निराशा आली — १९९९ वर्ल्ड कपचा सेमीफायनल अपघात, २००७ वर्ल्ड कपमधील कोसळलेली फलंदाजी, व अनेकदा ‘चोकर’ (chokers) म्हणून मिळालेला टॅग. पण ICC WTC 2025 FINAL मध्ये त्यांनी हे सर्व मागे टाकले आणि पहिल्यांदाच ICC TROPHY जिंकून इतिहास घडवला.

हा विजय का आहे इतका विशेष?

  • 1st ICC TROPHY: दक्षिण आफ्रिकेचा पहिला ICC किताब, जो त्यांनी अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर जिंकला.
  • ‘Chokers’ टॅग संपवला: अनेकदा अंतिम टप्प्यावर पराभूत होणाऱ्या संघाने अखेर आत्मविश्वास दाखवत सर्वोच्च पातळीवर यश मिळवलं.
  • क्रिकेटदृष्ट्या ऐतिहासिक दिवस: क्रिकेटच्या इतिहासात हा एक अविस्मरणीय दिवस म्हणून नोंदवला जाईल.

हे पण वाचा :-Tatkal Tickets चे नवीन नियम 2025 Samsung Galaxy Tab S10 FE: प्रीमियम अनुभव असलेला मिड-रेंज टॅबलेटमहाराष्ट्रात कधी आणि किती पाऊस पडणार?

1 thought on “ICC WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात”

Leave a Comment